मुंबईकरांसाठी आजचा दिवस ठरणार गोड! या मोठ्या खेळाडूला मिळू शकते टीम इंडियात स्थान

मुंबई | अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिका तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यात कसोटी संघाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर तर टी२० संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दोन्ही दौऱ्यावेळी भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली हा काऊंटी क्रिकेट खेळत असणार आहे.

Read- दोन मुंबईकर स्टार करणार भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व

त्यामुळे विराटच्या जागी या सामन्यात मुंबईकप श्रेयस अय्यरला स्थान मिळू शकते. तो भारताकडून ६ वनडे आणि ६ टी२० सामने खेळला आहे. वनडेत त्याने ४२च्या सरासरीने २१० तर टी२०मध्ये १७च्या सरासरीने ८३ धावा केल्या आहेत.

Read- हा आहे आयपीएल २०१८मधील एक सर्वोत्तम कॅच

ज्या एकमेव कसोटी सामन्यात रहाणेने संघाचे नेतृत्व केले होते त्या धरमशाला कसोटीत श्रेयसची दुखापतग्रस्त कोहलीच्या जागी संघात निवड झाली होती. परंतु त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. तो सामना जिंकत भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्धची मालिकाही जिंकली होती.

सध्या श्रेयस आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व करत असुन त्याने १० सामन्यात ५०च्या सरासरीने ३५१ धावा केल्या आहेत.

Read- १० पैकी ८ मॅच जिंकणारी हैद्राबादही होऊ शकते आयपीएलमधून बाहेर