दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन, राजू भालेकर इलेव्हन संघांची विजयी सलामी 

पुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक  क्रिकेट स्पर्धेत  भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने   वसंत रांजणे इलेव्हन संघाचा 27 धावांनी तर  राजू भालेकर इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 49 धावांनी  पराभव करत उद्धाटनाचा दिवस गाजवला. 

व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रणजीत खिरीदच्या जलद अर्धशतकी खेळीच्या जोरावर   भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने  वसंत रांजणे इलेव्हन संघाचा 27 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना  भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाने 15 षटकात 5 बाद 123 धावा केल्या. यात  रणजीत खिरीदने केलळ 31 चेंडूत 50 धावा केल्या तर  आशिष देसाईने 28 व शंतनू  सुगवेकरने  23 धावा करून रणजीतला सुरेख साथ दिली. 123 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रभाकर मोरे व अनिरुध्द ओक यांच्या अचूक गोलंदाजीपुढे  वसंत रांजणे इलेव्हन संघ 15 षटकात 8 बाद 96 धावांत गारद झाला. सनी मारवाडीने 22 व  मोेहन जाधव आणि गिरिष कुलकर्णी यांनी प्रत्येकी 16 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.  भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन संघाकडून प्रभाकर मोरेने  26 धावात 3 तर अनिरुध्द ओकने 11 धावात 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. 31 चेंडूत 50 धावा करणारा रणजीत खिरीद सामनावीर ठरला. 

दुस-या लढतीत नितिन सालमच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजू भालेकर इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 49 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना नितिन सालमच्या 30 धावांसह  राजू भालेकर इलेव्हन संघाने 15 षटकात 7 बाद 117 धावा केल्या. 117 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मंदार दळवी , अभिजीत फरांदे , नितिन सालम व शाम ओक यांच्या आक्रमक गोलंदाजीपुढे डी.बी. देवधर एलेव्हन संघ केवळ 14 षटकात सर्वबाद 68 धावांत गारद झाला. 22 चेंडूत 30 धावा व 6 धावांत 2 गडी बाद करणारा  नितिन सालम सामनावीर ठरला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

 भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन- 15 षटकात 5 बाद 123 धावा(रणजीत खिरीद 50(31), आशिष देसाई 28(27), शंतनू  सुगवेकर  23(18), पराग चितळे 3-14, सुभाष रांजणे 1-20, विवेक मालशे 1-30) वि.वि  वसंत रांजणे इलेव्हन – 15 षटकात 8 बाद 96 धावा(सनी मारवाडी22(17), मोेहन जाधव 16(18), गिरिष कुलकर्णी 16(13), प्रभाकर मोरे 3-26, अनिरुध्द ओक 2-11, शंतनू सुगवेकर 1-7, विश्वास गवते 1-15, भुषण देशपांडे 1-22) सामनावीर – रणजीत खिरीद 

भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन  संघाने 27धावांनी सामना जिंकला.  

राजू भालेकर इलेव्हन- 15 षटकात 7 बाद 117 धावा(नितिन सालम30(22), नितिन हार्डीकर 16(9), विनायक द्रविड 14(20),  रमेश हजारे 3-23, प्रसाद कानडे 2-20, आनंद नेरळकर 1-19, दिनेश कुंटे  1-18) वि.वि डी.बी. देवधर एलेव्हन-14 षटकात सर्वबाद 68 धावा(दिनेश कुंटे 27(33), मंदार दळवी 3-9, अभिजीत फरांदे 3-3, नितिन सालम 2-6, शाम ओक 2-16 ) सामनावीर- नितिन सालम

राजू भालेकर इलेव्हन संघाने 49 धावांनी सामना जिंकला.