प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात श्रीकांत जाधवचा या विक्रमाच्या यादीत समावेश

पुणे। सोमवारी(26 नोव्हेंबर) प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात श्री शिव छत्रपती स्पोर्टस कॉप्लेक्स, बालेवाडी येथे पार पडलेला 84 व्या सामन्यात बंगळूरु बुल्सने यूपी योद्धा संघाचा 37-27 अशा फरकाने पराभव केला.

मात्र यूपी योद्धाचा रेडर श्रीकांत जाधवने या सामन्यात 12 रेड पॉइंट्स मिळवताना खास पराक्रम केला आहे. त्याने प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात 100 रेड पॉइंट्स मिळवण्याचा टप्पा पार केला आहे.

या 6 व्या मोसमात असा पराक्रम करणारा तो एकूण 10 वा खेळाडू ठरला आहे. तसेच पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम त्याने या मोसमातील त्याच्या 16 व्या सामन्यात केला असून त्याने या मोसमात 4 सुपर रेड आणि 5 सुपर टेन केले आहेत. तसेच त्याची रेड पॉइंट्स घेण्याची सरासरी 6.31 आहे.

प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात सर्वाधिक रेड पॉइंट्स घेणारे कबड्डीपटू:

155 – पवन सेहरावत (14 सामने)

153 – सिद्धार्थ देसाई (14 सामने)

146 – परदीप नरवाल (13 सामने)

138 – अजय ठाकूर (15 सामने)

125 – विकास खंडोला (15 सामने)

104 – सचिन (13 सामने)

103 – नवीन कुमार (13 सामने)

101 – मनिंदर सिंग (11 सामने)

101 – श्रीकांत जाधव (16 सामने)

100 – नितिन तोमर (11 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

असा पराक्रम करणारा काशिलिंग अडके पहिला महाराष्ट्रीयन कबड्डीपटू

मिताली राजचा प्रशिक्षकांवर मोठा आरोप, संघातून वगळण्याबाबत केला मोठा खूलासा

भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घ्या सर्वकाही…