चिपळूणचा उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडु शुभम शिंदेची प्रो कबड्डीत पुणेरी पलटण संघात निवड

रत्नागिरी जिल्ह्यातील दसपटी चिपळूणचा अष्टपैलू खेळाडू कु. शुभम शिंदेंची प्रो कबड्डी पर्व ६ साठी पुणेरी पलटण संघात निवड झाली आहे.

वडील शशिकांत शिंदे भारतीय सैन्यदलात सेवा बजावून निवृत्त झालेत. त्यांनी सेवेत असताना सैन्यदलाच्या कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केलं होते. दोन भाऊ प्रितेश व किरण स्थानिक स्पर्धांमधले कोळकेवाडी संघाचे आघाडीचे खेळाडू आहेत.

पुढे त्यांनी मुंबई पोलीस कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केले. तर दुसरे बंधू आदित्य शिंदे वाघजाई कोळकेवाडी आणि सध्या एअर इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये शुभम व आदित्यच्या झंझावाताने त्यांच्या वाघजाई कोळकेवाडी संघाने रत्नागिरी जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धांमध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित केलं आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेत ही वाघजाई कोळकेवाडी संघाचा ठसा उमटवला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मानाची समजली जाणारी दसपटीची श्री रामवरदायिनीच्या यात्रेतील स्पर्धा कोळकेवाडी संघाला अनेक दशकांनी सलग दोन वेळा जिंकून देण्यात शुभम व आदित्य बंधूंचा सिंहाचा वाटा आहे.

स्थानिक स्पर्धांमध्ये त्याच्या खेळाला पैलू पाडण्याचे काम वाघजाई कोळकेवाडी संघाचा मुख्य प्रशिक्षक जगदीश शिंदे यांनी केलं. त्याच्याबरोबरच वडील शशिकांत शिंदे आणि बंधू प्रितेश यांनी शुभमच्या खेळातील प्रगतीवर बारकाईनं लक्ष ठेवले.

त्याच्यातील खेळाडूला आकार देण्याचं मोठे योगदान आणि कबड्डी मध्ये करिअर करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर सहप्रशिक्षक राजेश कुंभार, जेष्ठ खेळाडु नितीन कुंभार, चढाईपटू ओमकार कुंभार, सूरज वाशीटकर, सचिन राणे या संघ सहकाऱ्यांचे मोठे योगदान शुभमच्या यशात आहे.

सेंट्रल बँक व्यवसायिक कबड्डी संघात निवड झाली. सेंट्रल बँकेकडून व्यावसायिक स्पर्धांमध्ये छाप पडणाऱ्या शुभमने मग मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने त्याने एअर इंडिया संघात स्थान मिळवले व पहिल्याच स्पर्धेत स्पर्धेतील सर्वोत्तम पकडपटू होण्याचा मान मिळवला.

याच स्पर्धेदरम्यान प्रो कबड्डी स्पर्धेतील पुणेरी पलटण या संघाचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते श्री. अशोक शिंदे यांनी शुभम मधला खेळ बारकाईने हेरला. त्याचा हाच खेळ बघून प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामा साठी पुणेरी पलटण संघात स्थान दिले.

शैलीदार व आक्रमक चढाया तसेच खुबीनं बोनस गुण टिपण्याची चपळाई ही शुभमच्या खेळाची खासियत आहे. आदित्य सोबत मैदानात डिफेन्सला असताना दादा चढाईपटूची त्याचा समोर भंबेरी उडते.

त्यांच्या या आक्रमक बचावाच्या तंत्राने जणू सुरिंदर नाडा- मोहित चिल्लर या जोडीची आठवण येते. भविष्यात हे दोघे बंधू प्रो कबड्डी स्पर्धेत एकत्र खेळताना दिसतील अशी आशा आहे. आपल्या खेळाने चिपळूणची गौरवशाली परंपरा एका उंचीवर नेऊन ठेवतील असा विश्वास त्यांचा खेळ जवळून अनुभवलेले क्रीडारसिक व्यक्त करत आहेत.

कबड्डीच्या मैदानात आक्रमक असूनही वैयक्तिक आयुष्यात मात्र शुभम कमालीचा शांत आणि तेवढाच सिन्सियर आहे. त्याच्या कबड्डीच्या कारकिर्दीत यशस्वी होण्यासाठी हे गुणही तितकेच महत्वाचे ठरले आहेत.

शुभम बद्दल थोडक्यात ओळख-

नाव- कु. शुभम शशिकांत शिंदे
वय- १९ वर्ष ८ महिने
संघ- रत्नागिरी, महाराष्ट्र
स्थानिक संघ- वाघजाई कोळकेवाडी, दसपटी चिपळूण
व्यावसायिक संघ- सेंट्रल बँक, एअर इंडिया,पुणेरी पलटण
उल्लेखनीय कामगिरी-
सलग तीनवेळा महाराष्ट्र कुमार गट संघाचे प्रतिनिधित्व (२०१५ ,२०१६ ,२०१७)
महराष्ट्र कुमार गट संघाचे कर्णधारपद (२०१६)

महत्वाच्या बातम्या-