विश्वचषक गाजवलेल्या खेळाडूला मिळाले न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तीन वन-डे सामन्यांची मालिका सुरू होण्याआधीच भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला निलंबित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता.

या दोघांऐवजी विजय शंकर आणि शुबमन गिल यांना संघात स्थान देण्यात आले आहे. शंकर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यापासून संघाशी जोडला जाणार असून गिलला न्यूझीलंड विरुद्धच्या दौऱ्यासाठी निवडण्यात आले आहे.

हार्दिक आणि राहुलने कॉफी विथ करन या शोमध्ये महिलांबद्दल विवादात्मक विधाने केली होती. त्यामुळेच त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांना लवकरच बीसीसीआयने नेमलेल्या पॅनेलसमोर चौकशीसाठी सामोरे जावे लागणार आहे.

ही चौकशी संपेपर्यंत त्या दोघांवरील वरील निलंबन कायम राहणार आहे. याबरोबरच बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की, ‘हे खेळाडू चौकशी पूर्ण होईपर्यंत आयसीसी, बीसीसीआय किंवा देशांतर्गत क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात, कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही.’

गिल वरिष्ठ भारतीय संघाकडून न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण करेल तर शंकरने भारताकडून पाच टी20 सामने खेळले आहेत.

गिलने 2018च्या 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषकात उत्तम कामगिरी करत 104. 50च्या सरासरीने 418 धावा केल्या होत्या. यामुळे त्याला मॅन ऑफ टी टुर्नामेंटचा पुरस्कारही मिळाला होता.

सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्येही गिलने चांगली कामगिरी करत 10 डावांमध्ये 790 धावा केल्या आहेत. तर 37 लिस्ट एच्या सामन्यात  47.72 च्या सरासरीने 1529 धावा केल्या आहेत.

अष्टपैलू शंकरने भारत ए कडून खेळताना न्यूझीलंड ए विरुद्ध भारतीय संघाकडून सर्वोत्तम धावा केल्या होत्या. त्याने 50 षटकांच्या 14 सामन्यात 48.55च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तो मागील वर्षी झालेल्या निदहास ट्रॉफीच्या वेळीही भारतीय संघात होता.

काल (12 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला वन-डे सामना पार पडला. या सामन्यात भारताला 34 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 15 जानेवारीला अॅडलेड आणि 18 जानेवारीला मेलबर्न येथे होणार आहे.

तसेच न्यूझीलंड विरुद्ध भारत पाच वन-डे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माने किंग कोहलीचाही विक्रम टाकला मागे, आता फक्त तेंडुलकर आहे पुढे

काय सांगता! या संघाने जिंकले १००० सामने…

हिटमॅन रोहित शर्माने केली गांगुलीच्या दादा विक्रमाशी बरोबरी