पुन्हा एकदा अंडर१९ विश्वचषकातील स्टारचा आयपीएलमध्ये धमाका

कोलकाता | गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोलकाताने ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा विजय कोलकाताला गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घेऊन गेला.

या सामन्यात २विकेट्स आणि ३२ धावा करणाऱ्या सुनिल नारायणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

असे असले तरीही या सामन्यात दोन खेळाडूंची खुपच चर्चा झाली. एक म्हणजे एमएस धोनी तर दुसरा आहे शुबमन गिल.

शुबमन गिल हा शेवटपर्यंत नाबाद राहिला. आपला कर्णधार दिनेश कार्तिकला उत्तम साथ देत त्यांनी कोणतीही पडझड होऊ न देता संघाला विजय मिळवुन दिला.

३६ चेंडुत नाबाद ५७ धावा करताना त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचले. पृथ्वी शाॅनंतर कमी वयात अर्धशतक करणारा तो २०१८ अंडर १९ विश्वचषकातील दुसरा खेळाडू ठरला.

१८वर्षे आणि २३८ दिवसांचा असताना अर्धशतक करणारा तो आयपीएलमधील चौथा तरुण खेळाडू ठरला.

गेले काही सामने त्याला ६ किंवा ७व्या स्थानावार खेळावे लागले. परंतु काल कर्णधार कार्तिकने त्याला चौथ्या स्थानी संधी दिली आणि त्याने याचे सोने केले.

७ आयपीएल सामन्यात या खेळाडूने ४०.६७च्या सरासरीने १२२ धावा करत चुणूक दाखवुन दिली आहे.

२०१८ अंडर १९ विश्वचषकात खेळलेल्या भारताच्या १५ पैकी ३ खेळाडूंना आयपीएल २०१८ मध्ये आतापर्यंत संधी मिळाली असुन त्यातील पृथ्वी शाॅ आणि शुबमन गिलला या संधीचे सोने करता आले आहे तर शिवम मावीला मात्र यात चांगलेच अपयश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
Video- ओवरमध्ये जिंकायला हव्या होत्या ५ धावा, घडले असे काही की…