टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यानंतर या दोन संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज 14 जणांचा संघ घोषित केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या वनडे संघात जवळजवळ 9 वर्षांनी वेगवान गोलंदाज पिटर सिडलचे पुनरागमन झाले आहे. त्याने शेवटचा वनडे सामना 2010 मध्ये खेळला होता. पिटर बरोबरच उस्मान ख्वाजा, नॅथन लायन यांनीही वनडे संघात पुनरागमन केले आहे.

त्याचबरोबर झे रिचर्डसन, जेसन बेर्हेनडॉर्फ आणि बिली स्टॅनलेक यां वेगवान गोलंदाजांचाही ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

मात्र ट्रेविस हेड, ख्रिस लिन, डॉर्सी शॉर्ट, अॅश्टन एगर आणि बेन मॅक्डरमॉट यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 अशा पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघातून वगळण्यात आले आहे. तसेट मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर नॅथन कुल्टर नाइलला पाठीच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागणार आहे.

या ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऍरॉन फिंचकडे असेल तर उपकर्णधारपद मिशेल मार्श आणि ऍलेक्स कॅरे सांभाळतील.

ही वनडे मालिका 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे रंगणार आहे.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ-

ऍरॉन फिंच(कर्णधार), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनीस, मिशेल मार्श(उपकर्णधार), ऍलेक्स कॅरे(उपकर्णधार), झे रिचर्डसन, बिली स्टॅनलेक, जेसन बर्हेनडॉर्फ, पिटर सिडल, नॅथन लायन, ऍडम झम्पा.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: ‘तूला कंटाळा येत नाही का?’लायनचा पुजाराला प्रश्न

जगात कुणाला जे जमले नाही ते टीम इंडियाच्या २१ वर्षीय पंतने केले

कांगारुंना त्यांच्याच मातीत चितपट करणारा रिषभ पंत भारतातील पहिलाच विकेटकीपर