भारताकडून या खेळाडूने केले वनडे पदार्पण

नॉटिंगहॅम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारी, 12 जुलैला पहिला वनडे सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारताकडून मध्यमगती गोलंदाज सिद्धार्थ कौलला पहिल्यांदाच वनडे 11 जणांच्या वनडे संघात संधी देण्यात आली आहे.

त्याने 29 जूनला आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने 1 विकेट घेतली होती. तसेच त्याला 8जुलैला इंग्लंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यातही संधी देण्यात आली होती. या सामन्यात त्याने 2 विकेट घेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची शाबासकीही मिळवली होती.

सिद्धार्थ हा वनडेमध्ये पदार्पण करणारा भारताचा 221 वा खेळाडू ठरला आहे.

यावर्षी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून दमदार कामगिरीने सिद्धार्थ कौलने सर्वांचे लक्ष वेधले होते. तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला होता. त्याने आयपीएल 2018 मध्ये 17 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत.

याबरोबरच त्याची मागील दोन मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्तम कामगिरी झाली आहे.

त्याने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 52 सामन्यात 27.37 च्या सरासरीने 182 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये 61 सामन्यात 22.98 च्या सरासरीने 112 विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या आहेत

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून भारतीय वनडे संघात सुरेश रैनाही जवळजवळ 32 महिन्यांनी पुनरागमन करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

-भारतीय महिला क्रिकेटर सरावाला नकोच म्हणतात, मग नक्की संघ घडवायचा तरी कसा?

-भुवनेश्वर कुमारला वनडे कारकिर्दीत मैलाचा दगड पार करण्याची संधी

-भारत-इंग्लंड मालिका सुरु होण्यापुर्वी ह्या ५ खास गोष्टी नक्की माहीत करुन घ्या