Australian Open 2018: एका सामन्यादरम्यान तिने खाल्ली तब्बल दीड डझन केळी

मेलबर्न । ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आज सकाळच्या सत्रात सिमोना हॅलेप आणि लुरेन डेविस यांच्यात झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित हॅलेपने ४-६. ६-४, १५-१३ असा विजय मिळवला.

हा सामना तब्बल ३ तास ४४ मिनिटे चालला. दोन्हीही खेळाडूंची संपूर्ण सामन्यात चांगलीच दमछाक झाली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये हॅलेपने तब्बल तीन मॅच पॉईंट वाचवत लुरेन डेविसवर विजय मिळवला.

या संपूर्ण सामन्यात ऊर्जा टिकून राहण्यासाठी तिने तब्बल १८ केली खाल्ली. या संपूर्ण सामन्यात हॅलेपने ४ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कोर्टवर पार केले होते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर प्रेक्षकांकडून कौतुकाचा जोरदार वर्षाव झाला.

याबरोबर हॅलेपने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिचा चौथ्या फेरीचा अर्थात उपउपांत्यफेरीचा सामना नाओमी ओसाका बरोबर होणार आहे.

या सामन्याला महिलांच्या टेनिसमधील एक मोठा सामना असलयाचे अनेक दिग्गजांनी मतं व्यक्त केले. “मी जवळपास संपल्यात जमा होते. परंतु शेवटी आम्ही चांगला खेळ केला हे महत्वाचे आहे. ” असे सामना संपल्यावर हॅलेप म्हणाली.