वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत पीव्ही सिंधूचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश

चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

तिने आज (4 आॅगस्ट) जपानच्या अकान यमागुचीचा 21-16, 24-22 अशा फरकाने सरळसेट मध्ये पराभव केला आहे.

55 मिनिटे चाललेल्या या सामन्यात तिसऱ्या मानांकित सिंधूची खराब सुरुवात झाली होती. यमागुचीने पहिल्या सेटमध्ये 5-8 अशी आघाडी घेतली होती. पण नंतर सिंधूने खेळ उंचावत 12-12 अशी बरोबरी केली.

त्यानंतर सिंधूने आघाडी मिळवत 20 मिनिटात 21-16 अशा फरकाने हा सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतली.

दुसरा सेटमध्ये यमागुची आणि सिंधूमध्ये चांगलाच अटीतटीचा सामना झाला. पहिल्या सेटप्रमाणेच दुसऱ्या सेटमध्येही दुसऱ्या मानांकित यमागुचीने मध्यंतरापर्यंत 11-8 अशी आघाडी घेतली होती.

पण सिंधूने नंतर आक्रमक खेळ करत सेटमध्ये पुनरागमन केले. तिने 13-19 अशी पिछाडीवर असताना सलग 7 गुण जिंकत सेट 19-19 असा बरोबरीचा केला.

यानंतर मात्र दोघीही हार मानण्यास तयार नव्हत्या. अखेर 22-22 अशा बरोबरीनंतर सिंधूने 22-24 असा सेट जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

सिंधूचा अंतिम सामना स्पेनच्या कॅरोलिना मरिन विरुद्ध होणार आहे. मरिनने उपांत्य फेरीत चीनच्या हे बिंगजीआओला पराभूत केले आहे.

सिंधू आणि मरिन या दोघी 2016 च्या आॅलिम्पिकच्या अंतिम सामन्यातही आमने-सामने आल्या होत्या. तसेच या दोघी आत्तापर्यंत 12 वेळा आमने सामने आल्या असुन दोघींनीही एकमेकींविरुद्ध प्रत्येकी 6 वेळा विजय मिळवला आहे.

तसेच जर सिंधूने अंतिम सामन्यात विजय मिळवल्यास ती वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरेल.

याआधी या स्पर्धेत सिंधूने 3 पदके मिळवली आहेत. यात तिने 2013 आणि 2014 ला कांस्यपदक तर 2017 ला रौप्यपदक मिळवले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

विराट कोहली सोडून बाकी सर्व बुजगावणी…चाहते कडाडले

कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले