फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या यादीत पीव्ही सिंधू पहिल्या दहामध्ये

भारतीय बॅडमिंटनपटू आणि रियो ऑलिंपिक रौप्यविजेती पी.व्ही. सिंधू ही २०१८फोर्ब्स अॅथलेटिक महिलांच्या पहिल्या दहात सर्वाधिक कमाई करणाऱ्यामध्ये आहे. ती या यादीत सातव्या स्थानावर असून तिची कमाई ८.५ मिलियन डॉलर (६० कोटी) आहे.

या यादीत सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानी २३ ग्रॅंडस्लॅम जिंकलेली सेरेना विल्यम्स आहे. तिची कमाई १८.१ मिलियन डॉलर आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद जिंकणारी डॅने कॅरोलिन वोझनियाकी ही १३ मिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानी आहे.

स्लोआन स्टिफन्स ही टेनिसपटू (११.२ मिलियन डॉलर) तिसऱ्या स्थानी आहे. स्पेनची गार्बी मुगुरूजा (११ मिलियन डॉलर) आणि रशियाची मारिया शारापोवा (१०.५ मिलियन डॉलर) पहिल्या पाचमध्ये आहेत.

पहिल्या पाचमध्ये सगळ्या टेनिसपटू महिला असून पहिल्या दहामध्ये भारतीय बॅटमिंटनपटू सिंधू सातव्या तर निवृत्त झालेली रेस कार ड्रायव्हर डॅनिसा पॅट्रीक (७.५ मिलियन डॉलर) नवव्या स्थानावर आहे.

या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने जिंकले कांस्यपदक

दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती