किदांबी श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत

0 59

भारताचा किदांबी श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने जागतिक क्रमवारीत ४थ्या स्थानी असणाऱ्या शी युकीचा २१-१०, २१-१४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेले ३ भारतीय खेळाडू स्पर्धेबाहेर पडले असताना किदांबी श्रीकांतने जबदस्त खेळ करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ही त्याची सलग तिसरी सुपर सिरीज अंतिम फेरी असून या आधी सिंगापूर आणि जकार्ता सुपर सिरीजमध्ये त्याने अंतिम फेरी गाठली होती.

पहिल्या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी असताना त्याने चांगला खेळ करत आघाडी ११-७ अशी वाढवली. त्यानंतर सलग सलग ५ पॉईंट्स घेत आघाडी १६-९ अशी नेली. चीनच्या शी युकीला पहिल्या सेटमध्ये कोणतीही संधी न देता त्याने सेट २१-१० असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये पहिले काही पॉईंट्स अतिशय घासून सुरु असलेल्या सामन्यात श्रीकांतने ११-८ आघाडी घेतली. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत त्याने अखेर २१-१४ असा जिंकत सलग तिसऱ्यांदा सुपर सिरीज अंतिम फेरीत प्रवेश केला.

श्रीकांत केवळ दुसरा भारतीय आणि पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली, यापूर्वी २०१४ आणि २०१६ मध्ये सायना नेहवाल या स्पर्धेची अंतिम फेरी खेळली होती.

Comments
Loading...
%d bloggers like this: