युवराज सिंगच्या एका षटकात सहा षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी !

लंडन – वूस्टरशायरच्या रॉस व्हाईटलीने एका षटकात सहा षटकार लगावण्याचा विक्रम रविवारी लंडनमध्ये केला. असा विक्रम करणारा तो ५वा खेळाडू बनला आहे. व्हाइटलीने यॉर्कशायरचा डावखुरा फिरकी गोलंदाज कार्ल कार्व्हर याला सहा षटकार ठोकले. हेडिंग्लेमध्ये इंग्लिश ट्वेंटी -२० सामन्यात कार्ल कार्व्हरच्या १६व्या षटकात त्याने ३६ धावा केल्या.परंतु, व्हाइटलीने २६ चेंडूत ६५ धावा फटकावल्यानंतर तो बाद झाला आणि वूस्टरशायरला ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला.

यॉर्कशायरचा डेव्हिड व्हिलीने याआधी ११८ धावा केल्या होत्या, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जॉन हेस्टिंग्जच्या एका षटकात त्याने ३४ धावा काढल्या होत्या.

“लेग साईडची बाउंडरी थोडी छोटी होती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न मी केला” असे व्हाईटली म्हणाला.

रवी शास्त्री आणि युवराज हे भारतीय खेळाडू एका षटकात सहा षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील आहेत. भारत हा एकमेव देश आहे ज्यांच्या २ खेळाडूंनी हा विक्रम केला आहे.

एका षटकात सहा षटकार

सर गॅरी सोबर्स (काउंटी)
रवी शास्त्री (रणजी)
हर्षल गिब्स (विश्वचषक)
युवराजसिंग (टी- २०)
रॉस व्हाईटली (टी२० )