जाणुन घ्या याॅर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा २०१९च्या विश्वचषकात खेळणार की नाही?

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने एशिया कप स्पर्धेतून वन-डे संघात पुनरागमन केले होते. पुनरागमन केल्यापासून मलिंगा जबरदस्त फाॅर्मात आहे. लसिथ मलिंगाने एशिया कप स्पर्धेत चार सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या.

सध्या चालू असलेल्या इंग्लड आणि श्रीलंका यांच्यात वन-डे मालिका चालू आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यात मलिंगाने इंग्लडच्या 5 महत्वाच्या फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला होता.

जबरदस्त पुनरामगमन करणाऱ्या मलिंगाला आपण 2019 विश्वचषक स्पर्धेत खेळू की नाही यावर विश्वास नाही.

“जर मला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली तर हा माझा शेवटचा विश्वचषक असेल. मला  संघात संधी मिळण्याची आशा नाही. माझ्या भुतकाळात ज्या घटना घडल्या आहेत त्यावरून तरी मला असेच दिसते. पण जर मला संघात संधी मिळाली तर मी नक्की खेळणार.” असे मलिंगाने ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

श्रीलंकेतील घरगुती क्रिकेमध्ये त्याने खेळण्यास नकार दिला होता. जेव्हा तेथील स्थानिक सामने चालू होते, तेव्हा मलिंगा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीतील सल्लागार म्हणून काम पहात होता. त्यानंतर कॅनडातील ग्लोबल टी-20 लीगमध्ये आणि श्रीलंकेतील घरगुती टी-20 लीग मधील कामगिरीच्या आधारे त्याला संघात स्थान दिले आहे.

“मी फक्त एक खेळाडू आहे. मला जर खेळण्याची संधी दिली तर खेळणे हे माझे काम आहे. ” असेही मलिंगाने सांगितले.

महत्वाच्या बातम्या-