आहे जगातील सर्वात स्फोटक खेळाडू परंतू फलंदाजीत केला नकोसा विक्रम

नॉटिंगहॅम | भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडेत भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली.

६ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवला या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सामन्यात इंग्लंडकडून अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि जाॅनी बेयरस्टोने अर्धशतकी खेळी केली. परंतु यातील बेन स्टोक्सचे शतक हे अतिशय संथ गतीचे होते.

१००पेक्षा जास्त चेंडू घेत त्याने हे अर्धशतक केले. त्याने अर्धशतकी खेळासाठी चक्क १०२ चेंडूंचा सामना केला.

त्याला वैयक्तिक पहिला चौकार मारण्यासाठी ३७ चेंडूंचा सामना करावा लागला.

वनडेत माहित असलेल्या सामन्यांमधील ही भारताविरुद्ध चौथे सर्वाधिक चेंडू खेळून केलेले अर्धशतक होते.

यापुर्वी डीन जोन्स (१०८), गाॅफ मार्श (१०६) आणि ल्यु विन्सेंट (१०६) यांनी अर्धशतक करताना सर्वाधिक चेंडू घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सलग ७ वनडे मालिकांत ७ शतके करणारा रोहित शर्मा जगातील एकमेव खेळाडू

या वर्षी पहिल्या ६ महिन्यांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा करणारे ४ खेळाडू

आता मास्टर ब्लास्टर, किंग कोहली आणि हिटमॅनच्या नावावर आहे हा खास विक्रम

भारतीय वनडे संघाचे २४ कर्णधार झाले, पण जे विराटला केले ते कुणालाही जमले नाही

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..