श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी

कोलंबो | १९ वर्षाखालील श्रीलंका संघाने सिंहली स्पोर्ट्स क्लबवर रविवारी (५ ऑगस्ट) झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर निसटता विजय  मिळवला.

श्रीलंकेने भारतावर या चुरशीच्या सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.

श्रीलंकेचा कर्णधार निपुन धनंजयाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

श्रीलंकेने ४९.३ षटकात सर्वबाद २२० धावा केल्या होत्या. यामध्ये सलामीवीर नवोद पर्णविथानाने ७३ चेंडूत ६ चौकारांसह ५१ धावांचे योगदान दिले. तर दुसरा सलामीवीर निशान मधुष्काने ४२ धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजीत अजय देव गौडा, यतिन मंगवानी, आणि सिद्धार्थ देसाई यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

भारतीय गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी करत श्रीलंकेला कमी धावसंख्येत रोखण्यात यश मिळवले होते.

मात्र फलंदाजीत पवन शहा वगळता एकही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही.

पवन शहाने एकाकी झुंज देत ९४ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकाराच्या सहाय्याने ७७ धावांची खेळी केली.

श्रीलंकेच्या २२० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ४९.३ षटकात २१३ धावा करु शकला.

श्रीलंकेकडून पीएस दुलशानने ३ तर सदुन मेंडिस आणि नवोद पर्णविथानाने प्रत्येकी २ बळी मिळवले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

– दुसऱ्यासोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले

-आयसीसीने केले विराट कोहलीला माइक ड्रॉप प्रकरणावरुन ट्रोल