स्म्रिती मानधनाचा महिला क्रिकेटमधील एक खास विक्रम

0 185

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्यात आज स्म्रिती मानधनाने शतकी खेळी केली. या धमाकेदार शतकी खेळीत २१ वर्षीय मानधनाने अनेक विक्रम केले.

१२९ चेंडूत १३५ धावा करत तिने या सामन्यात १४ चौकार आणि १ षटकार खेचला आहे.

तिचे हे दक्षिण आफ्रिकेतील पहिले शतक असून अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १६ वनडेत एकही भारतीय महिला खेळाडूला दक्षिणेत शतकी खेळी करता आली नव्हती.

याबरोबर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतकी खेळी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

तत्पूर्वी भारताने आज ५० षटकांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ बाद ३०२ धावा केल्या आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: