स्टिव्ह स्मिथने केला हा कसोटी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

0 189

सिडनी । ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ॲशेस मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने ६००० हजार धावांचा टप्पा पार केला. हे करताना तो वेगवान ६००० धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला.

त्याने ६ हजार धावा करताना १११ डाव घेतले. डॉन ब्रॅडमन यांनी केवळ ६८ डावांत हा टप्पा पार केला होता. स्मिथने आज ही कामगिरी करताना गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे तर वॅली हम्मोन्ड यांचा विक्रम मोडला आहे. 

विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी २८ वर्ष आणि २१७ दिवसांचा असताना केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वयाच्या २६ वर्ष आणि ३१३ दिवसांचा असताना ही कामगिरी केली होती.

कमी डावात ६ हजार कसोटी धावा करणारे खेळाडू
६८ डाव- सर डोनाल्ड ब्रॅडमन
१११ डाव- स्टिव्ह स्मिथ
१११ डाव- सर गॅरी सोबर्स
११४ डाव- वॅली हम्मोन्ड

Comments
Loading...
%d bloggers like this: