पॉन्टिंगच्या मते कोण आहे स्मिथ आणि विराटमध्ये सर्वोत्तम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी त्यांची तुलना होऊ शकत नाही, ते दोघेही उत्तम असल्याची मते मांडली आहेत.

तर काहींचे असे म्हणणे आहे की स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये विराटला वरचढ आणि तर विराट मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात स्मिथपेक्षा वरचढ आहे. यात आता रिकी पॉंटिंगनेही आपली मते मांडली आहेत.

पॉन्टिंग सध्या चालू असलेल्या ऍशेस मालिकेत समालोचन करताना म्हणाला “तुम्ही बाकीच्या उत्कृष्ट खेळाडूंकडे बघा. विराट सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. पण तुम्ही जर जो रूट आणि केन विलिअमसन यांच्याकडे बघितले तर समजून येईल कि हे खेळाडू देखील जवळ जवळ स्मिथ इतकेच उत्तम आहेत. आणि हे मी आधीपासून सांगत आहे.”

आज स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील तिसरा सामना जिंकून ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.