स्टिव्ह स्मिथने बायको ऐवजी केले दुसऱ्याच महिलेला टॅग

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रॅडस्लॅम स्पर्धेत प्रेक्षक म्हणून हजेरी लावत आहे. त्याने याचे सोशल मीडियावर अनेक फोटोही शेयर केले आहे.

त्याने रॉजर फेडरर आणि जोकोविच यांच्या सामन्यांनाही हजेरी लावली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आली असून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर या स्पर्धेला हजेरी लावत आहे.

परवा फेडरर विरुद्ध मार्तोन फुकडोविकस सामन्याला स्टिव्ह स्मिथने हजेरी लावली होती. स्मिथ हा फेडररचा मोठा चाहता आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या स्पर्धेत फेडररने उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने रॉजर फेडररबरोबर एक खास फोटोही शेअर केला. 

तसेच हा त्याने पत्नीसोबतचा एक खास फोटोही शेअर केला. हे करताना त्याने एक चूक केली. त्याने ट्विटरवर बायको डॅनी विल्स हिला चुकीचं टॅग केल आहे. यामुळे स्मिथला ट्विटरवर चांगलाच ट्रॉल करण्यात आले आहे. स्मिथने @DaniWillis91 असे टॅग करण्याऐवजी @dani_willis असे टॅग केले आहे.

स्मिथच्या नेतृत्वाखाली नुकतेच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका जिंकली होती मात्र त्यानंतर चालू झालेल्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिले तीनही सामन्यात पराभव स्वीकारला आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरात स्मिथ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याला यावर्षी सर्वोत्तम कसोटीपटूचाही पुरस्कार मिळाला आहे.

या चुकीच्या टॅगमुळे स्टिव्हला मात्र चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले. काहींनी तर त्याला बेंगलोर कसोटीमधील ब्रेनफेडची आठवण करून दिली.