स्म्रीती मानधना ठरली किया सुपर लीगची सर्वोत्तम खेळाडू

भारताच्या टी20 संघाची उपकर्णधार स्म्रीती मानधनाला इंग्लंडमध्ये जुलै-आॅगस्ट महिन्यात पार पडलेल्या किया सुपर लीग स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ती या स्पर्धेत वेस्टर्न स्ट्रोम संघाकडून खेळली. तिने या संघाकडून खेळताना 10 सामन्यात 60.14 च्या सरासरीने 421 धावा केल्या. यात तिने 1 शतक आणि 2 अर्धशतके केली. तिने या धावा 174.68 च्या स्ट्राइकरेटने केल्या आहेत.

याबरोबरच ती या लीगमध्ये यावर्षी शतक करणारी एकमेव फलंदाज होती.

मात्र तिच्या संघाला तिच्या अनुपस्थितीत उपांत्य सामन्यात 27 आॅगस्टला सरे स्टार्स संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. ती श्रीलंका दौऱ्याच्या तयारीसाठी आधीच भारतात परतली असल्याने तिने हा उपांत्यसामना खेळला नव्हता.

स्म्रीती बरोबरच या लीगमध्ये हरमनप्रीत कौरही लँकेशायर थंडर संघाकडून खेळली होती. तिने या लीगमध्ये 7 सामन्यात 32.80 च्या सरासरीने 1 अर्धशतकासह 164 धावा केल्या आहेत.

या दोघींनाही किया सुपर लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिल्याने टी20 चॅलेंजर्स ट्रॉफीच्या संघात त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता.

भारतीय महिला संघ श्रीलंका दौऱ्यात 11 सप्टेंबरला पहिला वनडे सामना खेळणार आहे. तसेच या दौऱ्यात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अनुक्रमे 11,13 आणि 16 सप्टेंबरला वनडे सामने होतील. तसेच त्यानंतर 19 सप्टेंबरपासून 5 सामन्यांची टी 20 मालिका सुरु होईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

मनिष पांडेचा पुन्हा एकदा धमाका, एशिया कपमध्ये टीम इंडियात जागा पक्की!

– …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

-भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…