अखेर स्मृती मंधानाने संघ बदलला, तर हरमनप्रीत कौरचा संघ मात्र कायम

भारतीय टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाने २०१८-२०१९ च्या बिग बॅश लीगच्या सहभागाबद्दल होकार कळवला आहे.

ही लीग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

हरमनप्रीत कौरने २०१७मध्ये सिडनी थंडर संघासोबत २ वर्षांचा करार केला होता. तो आता तिने वाढवला आहे. तर दुसऱ्या बाजूला स्मृती मंधानाने मात्र या हंगामात होबार्ट हेरिकेन्ससोबत करार केला आहे. ती गेल्या हंगामात ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळली होती.

स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर हे महिला टी२० क्रिकेटमधील फेव्हरीट खेळाडू समजले जातात.

या दोन खेळाडू किया सुपर लीगमध्येही खेळल्या होत्या. त्यात मंधानाने जबरदस्त कामगिरी केली होती.

मंधाना ही बीबीएलच्या  या हंगामातील पहिला सामना न खेळण्याची शक्यता आहे. जो होबार्ट विरुद्ध पर्थ स्काॅचर्स संघात होत आहे. त्यामुळे ती आपला पहिला सामना ८ डिसेंबर रोजी मेलबर्न स्टार्स संघासोबत खेळू शकते.

या लीगमध्ये खेळणारी तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणजे वेदा कृष्णमुर्ती. ती गेल्या हंगामात होबार्ट संघाकडून खेळली होती. आता तिच्याच जागी मंधानाची या संघात निवड झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीच्या झंझावातापुढे रोहितचा तो कारनामा कुणाच्या लक्षातही आला नाही

सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ

विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण