स्म्रीती मानधनाची पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी, ९ षटकांतच जिंकून दिला सामना

भारतीय संघाची सलामीवीर स्म्रीती मानधनाने इंग्लंडच्या किया वुमन क्रिकेट सुपीर लीग २०१८मधील आपला फाॅर्म कायम राखला आहे. ३१ जूलै रोजी झालेल्या सामन्यात तिने २७ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली.

तिच्या याच खेळीमुळे वेस्टर्न स्टोर्म संघाने सदर्न वायपर्स संघाला ९ विकेट्सने पराभूत केले.

सदर्न वायपर्स संघ या सामन्यात १८.१ षटकांत ९१ धावांवर सर्वबाद झाला. हे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या वेस्टर्न स्टोर्म संघाने ९.३ षटकांतच या धावा केल्या. यात मानधनाने नाबाद ४३ धावांची खेळी करताना ६ चौकार आणि १ षटकार मारला.

या स्पर्धेत तीने ४८, ३७, नाबाद ५२ आणि नाबाद ४३ धावा केल्या आहेत.  तसेच या स्पर्धेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक षटकार आणि सर्वोत्तम स्ट्राईक रेटमध्ये ती अव्वल स्थानी आहे. ४ सामन्यात तीने १००पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने १८० धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच

संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत