साहेबांच्या भूमीवर मराठमोळ्या स्म्रीती मानधनाचे वर्चस्व

भारतीय संघाची सलामीवीर स्म्रीती मानधनाने इंग्लंडच्या किया वुमन क्रिकेट सुपीर लीग २०१८ मधील आपला फाॅर्म कायम राखला आहे.

स्म्रीती मानधनाने  शुक्रवारी (३ ऑगस्ट) ६१ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावत वेस्टर्न स्टोर्म संघाला लॅंकशायर थंडरवर   सात विकेट राखून विजय मिळवून दिला.

स्म्रीतीने आपल्या  १०२ धावांच्या शतकी खेळीत १२ चौकार आणि ४ षटकार लगावले.

लॅंकशायर थंडरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १५३ धावा केल्या होत्या.

वेस्टर्न स्टोर्मने स्म्रीती मानधनाच्या शतकाच्या जोरावर १८.३ षटकात ३ विकेट गमावून या १५३ धावांचा पाठलाग पूर्ण केला.

या स्पर्धेत स्म्रीतीने ४८, ३७, नाबाद ५२, नाबाद ४३ आणि १०२  धावा केल्या आहेत.  तसेच या स्पर्धेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक षटकार आणि सर्वोत्तम स्ट्राईक रेटमध्ये ती अव्वल स्थानी आहे.

तसेच या स्पर्धेत तीने ५ सामन्यात १०० पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने २८२ धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-एकेकाळी टीम इंडियावर तुटून पडणारा गोलंदाजही म्हणतो विराट कोहली भारी

-विराटसाठी कसोटी मालिकेची सुरवात यापेक्षा उत्कृष्ठ असूच शकत नाही