म्हणून षटकार किंग युवराज दादाची कीट बॅग आवरायचा!

भारताचा महान माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द बहरली आहे. यात विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग यांचाही समावेश आहे. त्यामुळे ते गांगुलीच्या अनेक सवयींशी परिचीत आहेत.

युवराज सिंग आणि विरेंद्र सेहवागने गांगुलीच्या बाबतचे असे अनेक गमतीशीर किस्से गांगुलीच्या ‘अ सेन्चुरी इज नॉट इनफ’ या आत्मचरित्राच्या अनावरण कार्यक्रमात  सांगितले आहेत.

असाच एक गांगुलीच्या कीट बॅगच्या बाबतचा किस्सा सेहवागने या कार्यक्रमात सांगितला आणि याला युवराजनेही पाठीेबा दिला.

सेहवाग म्हणाला, “जेव्हा आम्ही आत ड्रेसिंग रूममध्ये यायचो तेव्हा गांगुली आम्हाला त्याची कीट बॅग आवरायला सांगायचा. त्याला सामना संपला की लगेच पत्रकार परिषदेसाठी जायची घाई असायची, त्यामुळे तो आम्हाला त्याची कीट बॅग आवरायला सांगायचा. अगदी धोनीही त्याची कीट बॅग आवरायचा”

पण यावर गांगुलीने थोडे मजेशीर उत्तर देताना सांगितले की “ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही. खरंतरं मला  पत्रकार परिषदेसाठी जायची घाई आसायची आणि युवराजला नाईट आऊटला जायचं असायचं त्यासाठी आम्हाला उशीर करायचा नसायचा.”

“हा यामागचा गुपीत हेतू होता. त्यामुळे युवराज सामना संपला की माझी कीट बॅग लवकर आवरायचा. ” गांगुलीच्या या उत्तरावर प्रेक्षकांना मात्र हासू आवरता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताचे आयसीसी कसोटी क्रमवारीत मक्तेदारी कायम

एकदिवस सौरव गांगुली होणार बंगालचा मुख्यमंत्री!

क्रिकेटर जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ग्लोव्हजमध्ये ठेवतो स्क्वॅशचा चेंडू…

आज चुकीला माफी नाही, पराभूत संघासाठी पुढचा प्रवास खडतर

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद

धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!