आयपीएलमधला कुठला संघ आहे सोशल मिडियावर किंग..???

आयपीएल सुरु होऊन एक आठवडाच झाला आहे आणि एवढयात सर्वांना उत्सुकता लागली आहे की कोण होणार या पर्वाचा विजेता? मागील वर्षीच्या मोसमात डेविड वॉर्नरच्या सनरायझर्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला.

दरवर्षी बेंगलोरला आपल्या चाहत्यानंकडून बरेच प्रोत्साहन मिळते आणि हे फक्त मैदानावरच नाही तर सोशल मीडियावरही. सचिन तेंडुलकर आणि मुंबईच्या लोकप्रियतेमुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचाच बोलबाला आहे. पाहुयात कोण आहे सोशल मीडियाचा राजा.

क्रमवारी (सोशल मीडिया फॉलोवर्स):- 

क्रमवारीसंघफेसबुकट्विटरइंस्टाग्राम
१.        कोलकाता नाईट रायडर्स               

 

१,४९,५९,६४९               २५,२४,०३४३,१७,०००
२.       मुंबई इंडियन्स                             १,१०,२८,५७२             २०,४३,०००                 १०,१०,०००

 

३.       रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर               ९१,३७,४९४                २०,०१,०००                 १०,२०,०००

 

४.       किंग्स XI पंजाब                             ७७,८४,२३३                १०,२०,०००                  ०४,१५,०००

 

५.       सन रायझर्स हेंद्राबाद                      ४७,७७,०९६                १०,१२,०००                 २,४८,०००

 

६.    दिल्ली डेरडेव्हिल्स                        ३७,०३,७९९                 ०८,४५,०००                   ०२,५५,०००

 

७.       रायझिंग पुणे सुपरजायन्ट             १६,४३,६६१                 ०१,३८,०००                   ०२,२०,०००

 

८.       गुजरात लायन्स                            १२,०४,६१६                 ०१,९९,०००                   ०२,३८,०००

 

                                                           

पुणे आणि गुजरात या संघाना कमी फॉलव्हर्स आहेत कारण हे संघ मागील वर्षीच आयपीलमध्ये सामील झाले आहेत, तर दिल्लीच्या संघाला मैदानात आणि सोशल मीडिया दोन्हीकडे काही चांगली कामगिरी करत नाहीत हे दिसून येते. हैदराबाद संघाला २०१३ मध्ये नवीन मालक मिळाल्यामुळे त्यांची सोशल मीडिया पेजेस बाकी संघाच्या तुलनेत नवीन आहेत म्हणून त्यांना तसे कमीच लाईक्स आहेत.

 

त्याआधी पंजाबच्या संघाला चांगले लाईक्स आहेत, आता पर्यंत हा संघ फक्त एकदाच टॉप ४ मध्ये गेलेला असूनही या संघाला चांगला चाहता वर्ग लाभला आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिची लोकप्रियता आहे कारण ती या संघाची मालकीण आहे.

 

तसेच शाहरुख खान आणि संघाने मागील वर्षात केलेल्या चांगल्या खेळामुळे कोलकत्याकडे फेसबुकवर सर्वाधिक चाहता वर्ग आहे. तर मुंबई इंडियन्सच्या संघाला ट्विटरवर सर्वाधिक चाहते आहेत, या संघानेही मागील काही मोसमात रोहित शर्माच्या नेतृत्व खाली चांगली कामगिरी करत आयपीएलचा चषक पटकावला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरतर नेहमीच चर्चेत राहणारा संघ आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यामध्ये असलेले स्टार खेळाडू, या संघाकडून पहिल्या मोसमापासून खेळणारा विराट कोहली असो वा वेस्टइंडीएसचा क्रिस गेल असो. या संघाला इंस्टाग्रामवर फॉलो करणारा खूप मोठा चाहता वर्ग लाभला आहे.