ट्विटरकरांनी आकाश चोप्रावर फोडले फटाके!

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त सर्वांची दिवाळीची तयारीही सुरु झाली आहे. दिवाळी हा सण दिव्यांचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. तसेच दिवाळी सण हा दिवे, फराळ याचबरोबर फटाक्यांसाठीही ओळखला जातो.

दिवाळीत फटाके वाजवणे काही नवीन नाही परंतु फटाक्यांमुळे खूप ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. त्याचमुळे पर्यावरणप्रेमींचा फटाके वाजवण्याला विरोध आहे. आणि त्यात सोमवारी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीवर बंदी आणली आहे. यावर अनेक स्थरातून विचार मांडले जात आहेत.

प्रसिद्ध लेखक चेतन भगतने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी एक ट्विट केले होते. ते असे की “खरंच सुप्रीम कोर्टाने फटाक्यांवर बंदी घातली?पूर्ण बंदी ?लहान मुलांसाठी फटाक्यांविना दिवाळी काय असणार आहे?”

यावर ट्विटरवर भारताचा माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने चेतन भगतच्या ट्विटला उत्तर देताना प्रदूषण रहित दिवाळीचा सल्ला दिला आहे. यावर येणाऱ्या प्रतिक्रिया चांगल्याच वायरल झाल्या आहेत.

आकाश चोप्राने ट्विट केले आहे की “चेतन, माझी मुलगी जी ४ वर्षांची आहे ती सर्वांना प्रदूषण रहित दिवाळी साजरी करायला सांगत आहे. विचार कर जर आपली मुले मोठ्यांपेक्षा जास्त जागरुक आहेत.”

यावर आकाशला उत्तर म्हणून दुर्गेश सिंग यांनी ट्विट केले आहे की “आकाश तुझी मुलगी काय म्हणते जेव्हा लोक अजाणसाठी दिवसातून ५ वेळा लाऊडस्पिकर लावतात आणि लाखो प्राण्यांची ईद आणि मोहरमला कत्तल होते”

यावर आकाशने उत्तर दिले कि “ती याचा तिरस्कार करते. ती मला विचारते की खरंच देवाकडे आवाज पोहचण्यासाठी लाऊडस्पिकरची गरज आहे का ?तो बहिरा आहे का? “

यावर अनेक लोकांनी ट्विटरवर आकाश चोप्रावर टीका केल्या आहेत.  त्यांनी लहान मुलांना फटाके आवडतात, समालोचन करतानासुद्धा ध्वनी प्रदूषण होते. तसेच यात लोकांनी धर्मसुद्धा आणला आहे. त्याचबरोबर ते असेही म्हटले आहेत ज्या गाड्या तुम्ही वापरता त्यामुळेही वायू प्रदूषण होते. तर एकाने तर म्हटले आहे की क्रिकेट बॅटसाठी सुद्धा झाडे तोडली जातात यावर तुझी मुलगी काही विचारात नाही का? अश्या प्रकारे ट्विटरकरांनी आकाश चोप्रावर फटाके फोडले.