भारत वि. न्यूजीलँड: भारतीय संघाला तिसरा झटका, भारत १८ षटकांत ३ बाद ८६

0 235

मुंबई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या वनडेत सलामीवीरांच्या पाठोपाठ पुणेकर केदार जाधव १२ धावांवर बाद झाला आहे.

मिचेल सॅनटरने स्वतःच्याच गोलंदाजीवर केदारचा झेल घेतला. १२ धावांच्या खेळीत केदारने १ चौकार मारला. त्यापूर्वी रोहित शर्मा (२०) आणि शिखर धवन (९) धावांवर बाद झाले.
याबरोबर भारतीय संघात ४थ्या स्थानावर आपला हक्क कायम करण्याची मोठी संधी केदारने वाया घातली आहे.

सध्या मैदानावर दिनेश कार्तिकी आणि २०० वा वनडे सामना खेळत असलेला कर्णधार विराट कोहली आहेत. कोहली ४२ चेंडूत २९ धावांवर खेळत आहे.

सध्या भारतीय संघाच्या १८.३ षटकांत ३ बाद ८६ धावा झाल्या आहेत.

तत्पूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूजीलँड विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे यांना वगळण्यात आले असून बाकी संघ हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातीलच आहे.

कौटुंबिक कारणामुळे संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन पुन्हा आल्यामुळे रहाणेला वगळण्यात आले आहे तर मनीष पांडेच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ: शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.

Comments
Loading...
%d bloggers like this: