कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, रिग्रीन एन्टरप्रायझेस संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे । ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, रिग्रीन एन्टरप्रायझेस या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात राजेंद्र जाधव(3-27)याच्या भेदक गोलंदाजीसह अजित गव्हाणेच्या 70 धावांच्या खेळीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने ईक्यू टेक्नॉंलॉजीक संघाचा 121धावांनी पराभव करून आगेकूच केली.

प्रथम फलंदाजी करताना सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 20षटकात 5बाद 210धावा केल्या. यात अजित गव्हाणेने 29चेंडूत 9चौकार व 4षटकारांसह 70धावा, प्रफुल मानकरने 40चेंडूत 8चौकार व 2षटकारांसह 56धावा व , अमित कदमने 38चेंडूत 43धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.

या आव्हानाचा पाठलाग करताना ईक्यू टेक्नॉंलॉजीक संघ 16.4षटकात 89धावावर संपुष्टात आला. यात अभिजित आव्हाडने सर्वाधिक 31 धावा केल्या. सॉफ्टहार्ड ऑटोमेशनकडून केतन पासलकर(3-12), राजेंद्र जाधव(3-27), कुमार ठक्कर(1-5), अमित कदम(1-4)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.सामनावीर राजेंद्र जाधव ठरला.

दुसऱ्या सामन्यात सुरज शिंदे(66धावा)याने अफलातून फलंदाजीच्या जोरावर रिग्रीन एन्टरप्रायझेस संघाने बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड संघाचा 56धावांनी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी घातली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: 20षटकात 5बाद 210धावा(अजित गव्हाणे 70(29, 9×4, 4×6), प्रफुल मानकर 56(40,8×4, 2×6), अमित कदम 43(38,5×4,1×6), अमर गजभीये 2-28)वि.वि.ईक्यू टेक्नॉंलॉजीक: 16.4षटकात सर्वबाद 89धावा(अभिजित आव्हाड 31(33, 4×4,1×6), जुनेद सय्यद 21(16), केतन पासलकर 3-12, राजेंद्र जाधव 3-27, कुमार ठक्कर 1-5, अमित कदम 1-4);सामनावीर-राजेंद्र जाधव;

रिग्रीन एन्टरप्रायझेस: 20षटकात 6बाद 172धावा(सुरज शिंदे 66(34,8×4,4×6), इर्शाद शेख 46(37,5×4,2×6), संदीप जगताप 37(25,5×4,1×6), हुजेफा पूनावाला 3-18) वि.वि.बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड: 20षटकात 7बाद 116धावा(हुसेन शाकिर 38(31,5×4,1×6), अली जेपी 12(9), अनिस कचवाला 25(28), शरद शिंदे 2-17, अमोल जाधव 1-22, संदीप जगताप 1-17, स्वप्नील उगिले 1-23, शाहबाज सय्यद 1-24);सामनावीर-सुरज शिंदे.