7व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत सॉफ्टहार्ड, सेल2वर्ड, टेक महिंद्रा, फुजित्सु संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

पुणे । स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 7व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत सॉफ्टहार्ड, सेल2वर्ड, टेक महिंद्रा व फुजित्सु या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अमित कदमच्या दमदार 85 धावांच्या बळावर सॉफ्टहार्ड संघाने टीम स्प्रिंग संघाचा 96 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड संघाने 9 षटकात 3 बाद 128 धावांचा डोंगर रचला. 128 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजित गव्हाणेच्या अचूक गोलंदाजीपुढे टीम स्प्रिंग संघ 9 षटकात 5 बाद 31 धावांत गारद झाला. अमित कदम सामनावीर ठरला.

वैभव पंडूलेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर सेल2वर्ड संघाने कालसॉफ्ट संघाचा 4 गडी राखून पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना कालसॉफ्ट संघाने 9 षटकात 4 बाद 57 धावा केल्या. 57 धावांचे लक्ष वैभव पंडूलेच्या 39 धावांसह सेल2वर्ड संघाने केवळ 7.5 षटकात 4 बाद 62 धावांसह सहज पुर्ण केले. वैभव पंडूले सामनावीर ठरला.

अन्य लढतीत फुजित्सु संघाने इ ऑन्ड वाय संघाचा 6 गडी राखून तर टेक महिंद्रा संघाने गोद्रेज प्रॉपर्टीज् संघाचा 31 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उप-उपांत्यपुर्व फेरी
सॉफ्टहार्ड- 9 षटकात 3 बाद 128 धावा(अमित कदम 85, पारस रत्नपारखी 25, प्रतिक घुगे 2-33) वि.वि टीम स्प्रिंग- 9 षटकात 5 बाद 31 धावा(विक्रम घाटे 22, अजित गव्हाणे 2-20) सामनावीर- अमित कदम
सॉफ्टहार्ड संघाने 96 धावांनी सामना जिंकला

कालसॉफ्ट – 9 षटकात 4 बाद 57 धावा(अक्षय सोंडकर 29, हर्षद शेख 2-35) पराभूत वि सेल2वर्ड – 7.5 षटकात 4 बाद 62 धावा(वैभव पंडूले 39, जगदीश डोंग्रे 1-14) सामनावीर- वैभव पंडूले
सेल2वर्ड संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.

इ ऑन्ड वाय- 9 षटकात 3 बाद 69 धावा(राहुल चव्हाण 24, अजिंक्य पाटोळे 22, नितिन चौधरी 2-30) पराभूत वि फुजित्सु- 8.2 षटकात 2 बाद 70 धावा(तुषार अगरवाल 25, आकाश जाधव 2-14) सामनावीर- नितिन चौधरी
फुजित्सु संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.

टेक महिंद्रा- 9 षटकात 3 बाद 73 धावा(अंकित ठाकरे 26, रोहित डिंग्रा 2-16) वि.वि गोद्रेज प्रॉपर्टीज्- 9 षटकात 5 बाद 42 धावा(मोहित मिश्रा 24, मनिष कुमार 2-7) सामनावीर- प्रतिक दुबे
टेक महिंद्रा संघाने 31 धावांनी सामना जिंकला.