जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अक्षया, स्नेहा, रुधिमा, शर्वरीला सुवर्णपदक

पुणे | कै. स्वप्निल जयंत सोमण्स यांच्या जन्मस्मृतीदिनानिमित्त पुणे जिल्हा अ‍ॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अक्षया शेडगे, स्नेहा शिंदे, रुधिमा व्होरा यांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात सुवर्णपदक मिळवले.

सोमण्स हेल्थ क्लबतर्फे आयोजित ही स्पर्धा बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशालेत सुरू आहे. पुढील महिन्यात १ ते ३ जून दरम्यान सिंधुदुर्ग, कुडाळ येथे होणाºया राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पधेर्साठी पुणे जिल्हा संघाची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे.

त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धेचे उद्घाटन नू.म.वि. शाळेच्या मुख्याध्यापिका संजिवनी ओमासे आणि गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी रमेश परचुरे, पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे राजेश जाधव, सोमण्स हेल्थ क्लबचे प्रमुख राजहंस मेहेंदळे उपस्थित होते.

या स्पर्धेत पुणे शहर; तसेच पिंपरी-चिंचवड, वडगाव मावळ या ठिकाणाहून ६० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले. सोमण्स हेल्थ क्लब, शिवदुर्ग व्यायामशाळा, मल्टिफीट, महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब, फिशर क्लब, आझम स्पोर्ट्स क्लब यासोबतच पुण्यातील विविध व्यायामशाळेचे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदा या तिसरे वर्ष आहे.

निकाल : वरिष्ठ महिला – ५२ किलो – शर्वरी इनामदार (सोमण्स हेल्थ क्लब) – २९२.५ किलो.
५७ किलो – अस्मिता ढवळे (एफटीए) – २१० किलो. ६३ किलो – गौरी शिंदे (सोमण्स हेल्थ क्लब) – २८२.५ किलो, श्रद्धा राठोड (सोमण्स हेल्थ क्लब) – २६७.५ किलो, मुद्रा काळे (सोमण्स हेल्थ क्लब) – २२५ किलो.
७२ किलो – अक्षया शेडगे (सोमण्स हेल्थ क्लब) – ३९० किलो. ८४ किलो – स्नेहा शिंदे (पीसीएमसी) – ३१२.५ किलो.८४ किलोवरील – रुधिमा व्हारो (सोमण्स हेल्थ क्लब) – २५० किलो. मास्टर्स वूमेन : ५२ किलो – रेष्मा शहा (सोमण्स हेल्थ क्लब) – १७२.५ किलो.५७ किलो – दीपा लुंकड (सोमण्स हेल्थ क्लब) – २१० किलो. ज्युनिअर वूमेन : ४३ किलो – अर्सालना खान (आझम) – ११० किलो. ४७ किलो – सेहेज मैनी (सोमण्स हेल्थ क्लब) – १६७.५ किलो, शालू प्रजापती (आझम) – १६० किलो. ५२ किलो – अफशा अहमद (आझम) – १४७.५ किलो, ज्योती चौधरी (आझम) – १३५ किलो. ५७ किलो – उझमा शेख (आझम) – १२५ किलो. ६३ किलो – एम. प्रशांती (आझम) – १९० किलो, मैथिली शिंगाडे (एफटीए) – १८५ किलो. ७२ किलो – अक्षया शेडगे (सोमण्स हेल्थ क्लब) – ३९० किलो, प्राजक्ता भोसले (एफटीए) – २३७.५ किलो. ८४ किलो – स्नेहा शिंदे (पीसीएमसी) – ३१२.५ किलो. ८४ किलोवरील- रुधिमा व्होरा (सोमण्स हेल्थ क्लब) – २५० किलो.