नेहराच्या पदार्पण ते निवृत्तीच्या काळात हे महान क्रिकेटपटू होऊन गेले !

आपणास हे माहीतच आहे की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तब्बल २५वर्ष क्रिकेट खेळला परंतु भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने देखील भारताकडून मोठी आंतरराष्ट्रीय किरकिर्द घडवली आहे. वेगवान गोलंदाज असूनही या खेळाडूने भारताकडून तब्बल १८वर्ष क्रिकेट खेळले आहे.

नेहरा ह्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी होणार टी२० सामना नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे.

या खेळाडूचे आंतरराष्ट्रीय पदार्पण मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली २४ फेब्रुवारी १९९९ ला श्रीलंकेविरुद्ध झाले. त्यानंतर हा खेळाडू तब्बल ७ वेगवेळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला. ही गोष्टही आता क्रीडाप्रेमींसाठी नवी नाही.

पंरतु असे काही क्रिकेटर आहेत ज्यांनी नेहराने आतंरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि नेहरा आधीच निवृत्ती घेतली. विशेष म्हणजे हे खेळाडू कुणी साधेसुधे खेळाडू नाहीत. अनेक विक्रम या दिग्गज खेळाडूंच्या नावावर आहेत.

यातील काही नावे तर अशी आहेत ज्यांच्यावर आपला विश्वासही बसणार नाही. मायकल वॉन, स्कॉट स्टायरिस, रामनरेश सारवान, पॉल कॉलिंगवूड, माईक हसी वगैरे खेळाडू हे नेहरानंतर क्रिकेटमध्ये आले आणि नेहरा आधी निवृत्त झाले.

भारतीय खेळाडूंमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान सारख्या दिग्गजांचा यात समावेश होतो .

या यादीतील अशीच काही नावे…
वीरेंद्र सेहवाग
तिलकरत्ने दिलशान
मायकल वॉन
ब्रेट ली
स्कॉट स्टायरिस
कुमार संगकारा
युनूस खान
रामनरेश सारवान
झहीर खान
ग्रॅमी स्मिथ
पॉल कॉलिंगवूड
ब्रॅन्डन मॅकलम
शेन वॉटसन
मायकल क्लार्क
अँड्रू स्ट्रॉस
इयान बेल
माईक हसी
मिचेल जॉन्सन