रोनाल्डोचे मेस्सीला आव्हान, चाहते आले टेन्शनमध्ये

युवेंट्सचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने मोठ्या काळापासून प्रतिस्पर्धी असलेल्या लियोनल मेस्सीला आव्हान केले आहे. मेस्सी हा पहिल्यापासूनच बार्सिलोना या स्पॅनिश क्लबकडून खेळत आला आहे. त्याने आता इटलीमध्येही खेळावे असे आव्हान रोनाल्डोने केले आहे.

रोनाल्डो पोर्तुगल, स्पेन, इटली आणि इंग्लंड या देशात खेळला आहे. तर मेस्सी हा स्पेनमध्येच खेळत आहे. आता त्याने दुसऱ्या देशातही खेळावे असे रोनाल्डोचे म्हणणे आहे.

या दोघांनीही प्रत्येकी पाच बॅलोन दी’ओरचे पुरस्कार पटकावले आहे. यावर्षी या दोघांना मागे टाकत रियल माद्रीद आणि क्रोएशियाचा फुटबॉलपटू लुका मोड्रीचने मिळवला.

“मला आव्हाने स्विकारायला आवडतात. तसेच मला चाहत्यांना खूष ठेवायलाही आवडते”, असे रोनाल्डो म्हणाला.

रियलकडून 2017-18 चॅम्पियन्स लीग जिंकल्यावर रोनाल्डोने चार वर्षासाठी युवेंट्ससोबत 100 युरोचा करार केला.

“नऊ वर्षे रियलकडून खेळल्यावर युवेंट्स क्लब जोडल्यावर मी योग्य क्लबकडून खेळत आहे का हा प्रश्न पडला होता. मात्र माझा निर्णय बरोबर आहे हे आता पटले आहे”, असे रोनाल्डो म्हणाला.

रोनाल्डोला युवेंट्सकडून पहिला गोल करण्यास बरेच दिवस घेतले होते. त्याने या हंगामात 11 गोल केले असून त्याचे कारकिर्दीत एकूण 584 गोल झाले आहेत.

असे असले तरी युवेंट्सचा संघ याआधीच चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचला असून ते या लीगमधील साखळी फेरीचा अंतिम सामना बुधवारी (12 डिसेंबर) यंग बॉइज विरुद्ध खेळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

सामना संपल्यावर टीम इंडियातील या दोन खेळाडूंनी ३० मिनीटांनीच सुरु केला सराव

विजयानंतर संघातील १० खेळाडू होते खूश तर एकटा इशांत होता नाराज

ISL 2018: बेंगळुरू-मुंबई यांच्यात बरोबरी