एशियन गेम्स: पदक जिंकल्याने त्या खेळाडूला आता मिलिट्रीत काम करावे लागणार नाही

दक्षिण कोरिया आणि टोटेनहॅम हॉटस्परचा फुटबॉलपटू सन ह्युंग मिन हा २१ महिने मिलिट्रीमध्ये काम करण्यापासून बचावला आहे. त्याच्या सोबतच त्याचे राष्ट्रीय संघसहकारीही यातून वाचले आहेत.

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये १ सप्टेंबरला झालेल्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाने जपानला २-१ने पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.

झाले असे की, जर दक्षिण कोरियाने ऑलिंपिक किंवा २०१८च्या एशियन गेम्समध्ये एकही पदक जिंकले नाही तर त्यांना २१ महिने मिलिट्रीमध्ये काम करावे लागणार होते.

जपान विरुद्ध सामन्याच्या ९० मिनिटात एकही गोल न झाल्याने सामना अधिक वेळेत गेला. यामध्ये वॅंग ही चॅन आणि ली स्युंग वू या पर्यायी खेळाडूंनी सामना पूर्णपणे बदलला.

सामना जिंकल्यावर सनने मैदानात ध्वज घेऊन आनंद व्यक्त केला.

२०१४मध्ये दक्षिण कोरियानेच सुवर्णपदक मिळवले होते पण त्यांचा मिडफिल्डर ली जाइ संग यानेच चांगली कामगिरी केली होती. तर सन हा या स्पर्धेत खेळलाच नव्हता. कारण तेव्हा तो बायेर लेवाकुझी या जर्मन फुटबॉल क्लबकडून खेळत होता आणि त्यांनी सनला एशियन गेम्समध्ये खेळण्यास मनाई केली होती.

इंडोनेशियात पदक जिंकल्याने आता त्यांना फक्त चार आठवड्याचा सराव करावा लागणार आहे. याचा अर्थ असा की, सन आता प्रीमियर लीगमध्ये टोटेनहॅमकडून खेळू शकतो तर वू आणि चॅनही त्यांची युरोपमधील कामगिरी परत सुरू करू शकतात.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक

प्रीमियर लीग: लीव्हरपूलचा सलग चौथा विजय