मुलामुळे शिखर धवन झाला भावुक

काल शिखर धवनने सोशल माडियावरून त्याचा मुलगा झोरावरचा एक व्हिडीओ पोस्ट केला. शिखर नेहमीच त्याच्या कुटुंबाचे फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

काल त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओत झोरावर परवा पुण्यात झालेल्या वनडे सामन्याच्या आधी राष्ट्रगीत होते त्यात शिखरला शोधत होता आणि पापा पापा म्हणून ओरडत होता. हा विडिओ पोस्ट करताना धवनने लिहिले आहे की “हा व्हिडीओ बघताना माझे मन भरून आले, ज्याप्रकारे झोरावर मला शोधत आहे. माझे आशीर्वाद आणि प्रेम कायमच माझ्या मुलांबरोबर आहे.”

धवनने परवा झालेल्या न्यूजीलँडविरुद्धच्या २ऱ्या वनडे सामन्यात ६८ धावांची खेळी उभारली होती. या खेळीने भारताला भक्कम सुरवात करून दिली होती. या सामन्यात भारताने न्यूजीलँडवर ६ विकेट्सने विजय मिळवला होता.

या विजयामुळे भारताने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता परवा मालिकेतील ३ रा आणि शेवटचा निर्णायक सामना कानपूरला होणार आहे.