मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एसपीएनचा अंबॅसॅडर

मुंबई, जुलै १८: सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन) ने सचिन तेंडुलकरला एसपीएनच्या खेळांकरिताचा अंबॅसॅडर घोषित केले असून, एक समूह म्हणून सगळ्या खेळाच्या ब्रॅन्ड्सचे काम आता एकत्रितपणे एकाच व्यावसायिक छता खाली – सोनी पिक्चर्स स्पोर्टस नेटवर्क (एसपीएसएन) नावाने होणार आहे.
२ नवीन एचडी वाहिन्यांसह, सोनी टेन २एचडी आणि सोनी टेन ३एचडी, या११ वाहिन्या उत्तम पद्धतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ आणि त्यासंबंधीत गोष्टी आपल्या प्रेक्षकांच्या दिमतीला हजर करणार असून, सोनी आता भारतीय उपखंडातील सगळ्यात मोठे खेळाचे प्रसारक बनणार आहेत.

बहु-विविध खेळांमध्ये आपल्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याकरिता आणि त्यासाठीची प्रेक्षणीय संस्कृती निर्माण करण्याकरिता, भारत आणि उपखंडामध्ये, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स द्वारे गो-बियॉंड विथ द थीम # नावाने “खेळाने आयुष्यास प्रेरणा मिळते” या उक्तीचे समाकलन केले जाणार आहे.

एसपीएनच्या विविधतेमध्ये ११ वाहिन्यांना एक वेगवेगळा मान आणि आपली वेगळी अशी ओळख दिली जात असल्याने, प्रत्येक वाहिनीला आपले असे वेगळेपण मिळालेले आहे, आणि त्या वापरकर्त्यंकरिता अगदी सहज आणि सुलभ झालेल्या आहेत, मग तो नवीन प्रेक्षक असो, खेळाचा जोश असणारा प्रेक्षक असो की खेळाचा प्रेमी असो.
यावेळी बोलताना सचिन म्हणाला, “सोनी पिक्चर्स नेटवर्कचे ब्रीदवाक्य असलेले ‘Go-Beyond’ माझा विश्वास तर दर्शवितेच पण माझे प्रतिध्वनीत देखील करते. खेळाने मला शिकविलेल्या, अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे स्वत:च्या कक्षा सातत्याने रुंदावणे आणि स्वत:ला आपल्या सीमांपलिकडे जाऊन कार्य करण्याचा प्रयत्न करणे. आणि जसे खेळामध्ये तसेच आयुष्यात देखील. यशाच्या उच्च स्थानावर पोहोचल्यानंतर सुद्धा, अपले शिक्षण कधीच थांबत नाही.”

“प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने, खेळ आपल्याला आपल्यातील सर्वोत्तम, बाहेर काढण्यास मदत करत असतात. मी नेहमीच खेळाचा एक विद्यार्थीच असेन, कारण माझ्याकरिता खेळ आपल्या आयुष्यास प्रोत्साहन देतात. सोनी पिक्चर्ससह जोडले जाणे हा माझ्यासाठी एक विशेषाधिकार आहे, ज्यामुळे विविध-खेळ बघण्याची एक नवी संस्कृती आम्ही भारतीय उपखंडात रूजविण्याचा प्रयत्न करणार आहोत. एसपीएन चा खेळाचा अंबॅसॅडर म्हणून, मी या बदलाचे समर्थन नक्कीच करीन.”


११ वाहिन्यांच्या कार्यक्रमाची सूची खाली दिल्याप्रमाणे असेल, ज्यात ५ एसडी आणि ६ एचडी वाहिन्यांचा समावेश असेल:

सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी

होम ऑफ़ क्रिकट

सोनी टेन १ आणि सोनी टेन १ एचडी

होम ऑफ़ रेस्लिंग एंटरटेन्मेंट 

सोनी टेन २ आणि सोनी टेन २ एचडी

द गेम ऑफ़ फ़ुटबॉल

सोनी टेन ३ आणि सोनी टेन ३ एचडी

बेस्ट ऑफ़ स्पोर्ट्स इव्हेंट्स इन हिंदी

सोनी ईएसपीएन आणि सोनी ईएसपीएन एचडी

बेस्ट ऑफ़ इंटरनॅशन स्पोर्ट्स

सोनी टेन गोल्फ़ एचडी

नॉन-स्टॉप गोल्फ़िंग ऎक्शन