महिला बुद्धिबळपटूचे बुरख्याविरोधात बंड, सौम्या स्वामीनाथनची एशियन चेस चॅम्पियनशीपमधून माघार

26 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान इराणमधील हमादन शहरात होत असलेल्या एशियन टीम चेस चॅम्पियनशीप स्पर्धेतून भारताची माजी ज्यूनिअर गर्ल्स चॅम्पीयन सौम्या स्वामिनाथन हिने या स्पर्धेतून माघार घतली आहे.

या स्पर्धेदरम्यान इराणमधील महिलांनी बुरखा घालण्याच्या प्रथेप्रमाणे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या परदेशी महिलांनीही बुरखा घालूनच स्पर्धेत सहभागी व्हावे असा नियम स्पर्धेच्या आयोजकानी कायम ठेवल्याने सौम्या स्वामिनाथनने स्पर्धेत सहभागी न होण्याची घोषणा केली.

तिने याची माहिती तिच्या फेसबुक वॉलवरील पोस्टच्या माध्यमातून दिली. सौम्या म्हणाली, “मला तुम्हाला हे सांगताना खूप वाईट वाटते की, मी एशियन टिम चेस चॅम्पीयनशीप स्पर्धेतून माघार घेत आहे. मी इराणमधील महिलांप्रमाणे बुरखा घालू शकत नाही. माझ्यावर बुरखा घालण्याची जबरदस्ती करणे माझ्या मानवी अधिकाराचे उल्लंघन आहे. इतकी महत्वाची स्पर्धा होत असताना स्पर्धेच्या आयोजकांनी खेळाडूंच्या मुलभूत अधिकारांचा विचार करायला हवा होता.”

यापूर्वी भारताची महिला शूटर हिना सिद्धूने याच कारणावरुन एशियन एअर गन मीटर स्पर्धेतून माघार घेतली होती. तसेच गेल्या वर्षी तेहरान येथिल नॉकआउट वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेतून बुरखा न घालण्याच्या कारणावरुन अमेरिकेच्या नाजी पॅकिड्जेने माघार  घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-

गौतम गंभीरने आजपर्यंत एवढा ‘गंभीर’ आरोप कधीच केला नसेल!

फलंदाजांनो सावधान, स्टेनगन लवकरच धडाडणार!