गतविजेता सौरभ वर्मा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून बाहेर

0 552

नागपूर । गतविजेता सौरभ वर्माने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या दुखापतीमधून सावरत असून पुढील स्पर्धेच्या फिटनेससाठी तो लक्ष देणार आहे.

सौरभ वर्माने सप्टेंबर महिन्यात झालेल्या जपान ओपन सुपर सिरीजमध्ये सहभाग घेतला होता. हैद्राबाद येथे सराव करताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो डेन्मार्क आणि फ्रेंच ओपनमध्ये खेळू शकला नव्हता.

सौरभ वर्मा २०११ आणि २०१६ यावर्षात वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकला आहे. तसेच मागच्या वर्षीची चायनीज ताइपे मास्टर्स ही त्याने जिंकली असून बिटबर्गर ओपनमध्ये तो मागच्या वर्षीचा उपविजेता होता.

“मी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप खेळणार नाही. कारण सध्या मी सर्वात्कृष्ट कामगिरी करून शकत नाही. जपान ओपन सुपर सिरीज नंतर हैद्राबाद येथे तयारी करत असताना पायाला दुखापत झाल्यामुळे मी या आठवड्यापासून प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे.”

“मी चायना ओपन आणि हाँग काँग ओपन खेळणार आहे. माझ्यासाठी हे वर्ष संमिश्र राहिले. त्यामुळे आता मी या गोष्टीचा खूप जास्त विचार करणार नाही.”

Comments
Loading...
%d bloggers like this: