सौरव गांगुली नेहराला ‘पोपट’ म्हणत असे: युवराज सिंग !

दिल्ली । माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा दिल्ली टी२० सामना हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. नेहराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचे एकवेळचे संघसहकारी रोज नेहराबद्दलच्या आपल्या मैत्रीला उजाळा देत आहे.

बुधवारी नेहराबद्दल युवराज सिंगने फेसबुकच्या माध्यमातून एक खास पोस्ट केली. ज्यात युवराज म्हणतो, ” सौरव गांगुलीने आशिष नेहराला पोपट असे नाव दिले होते. मला असं म्हणायचं आहे की नेहरा अगदी पाण्याखालीही बडबड कटू शकतो. तो एक विनोदी माणूस आहे. “

“तुम्ही जर नेहराबरोबर असाल तर तुमचा दिवस कधीच खराब जाणार नाही. तो तुम्हाला हसवून हसवून वेडा करेल.”

या पोस्टमध्ये युवराजने नेहराबरोबरच्या भूतकाळातील अनेक गोष्टींना उजाळा दिला आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना उद्या राजकोट येथे होत आहे.