टीकाकारांचा धनी ठरलेल्या धोनीच्या मदतीला आला त्याचाच पहिला कर्णधार

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीवर 22 जूनला 2019 विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध धीम्या गतीने केलेल्या खेळीबद्दल मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण आता धोनीला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाठिंबा दिला आहे.

धोनीने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात 52 चेंडूत फक्त 28 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने केदार जाधव बरोबर 14 षटके फलंदाजी करताना केवळ 57 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे त्यांच्या या संथ खेळीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही टीका केली होती.

पण आता गांगुलीने धोनी चांगला फलंदाज असल्याचे आहे आणि तो चांगले पुनरागमन करेल असे म्हणत पाठिंबा दिला आहे.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार गांगुली म्हणाला, ‘शेवटी एमएस धोनी चांगला फलंदाज आहे आणि अफगाणिस्तान विरुद्ध त्याने अशी खेळी केली असली तरी तो या विश्वचषकामध्ये स्वत:ला नक्कीच सिद्ध करेल. हा फक्त एक सामना होता.’

या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात केवळ 224 धावा करण्यात यश आले होते. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली होती.

तसेच अफगाणिस्तानने 224 धावांचा पाठलाग करताना भारताला चांगली लढत दिली होती. पण ते विजयापासून केवळ 11 धावा दूर राहिले. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने हॅट्रिक घेतली होती.

भारताचा या विश्वचषकातील पुढील सामना 27 जूनला विंडीज विरुद्ध होणार आहे. हा सामना मॅनचेस्टरला ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

३६ वर्षांपुर्वी कपिल देवच्या टीम इंडियाने करोडो भारतीयांची स्वप्ने पुर्ण केली होती

भुवनेश्वर कुमार करतोय नेटमध्ये गोलंदाजी; भारतीय संघाला मोठा दिलासा, पहा व्हिडिओ

तब्बल १ वर्षाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या वॉर्नरचे नाव आता सन्मानाने सचिन-हेडनच्या यादीत घेतले जाणार