विराटवर टीका करणाऱ्या ग्रॅमी स्मिथला गांगुलीची सणसणीत चपराक

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज ग्रॅमी स्मिथने विराटवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन्ही कसोटीत पराभव स्वीकारला होता, त्यामुळे स्मिथने विराटवर टीका केली होती.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन वर्षात पहिल्यांदाच कसोटी मालिका गमावली आहे. त्यामुळे विराटवर अनेकांनी टीका केली केली. परंतु आज स्मिथच्या टीकेला उत्तर देताना गांगुलीने इ इंडिया टुडेशी बोलताना विराटला पाठिंबा दिला आहे.

यावर गांगुली म्हणाला, ” मी ग्रॅमी स्मिथशी सहमत नाही. विराटची कर्णधार म्हणून पहिलीच आशिया बाहेरची कसोटी मालिका आहे. त्याने जेवढे भारतात किंवा भारताबाहेर सामने खेळले आहेत त्यापेक्षा त्याने जेवढ्या सामन्यात कर्णधार पद भूषवले आहे त्यामानाने तो तरुण आहे. त्यानुसार आटा फक्त दोनच सामने झाले आहेत. आणि माझ्यामते स्मिथचे हे कठोर भाष्य होते. तो जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला जाईल तेव्हा नक्कीच सुधारणा करेल. तो यातून शिकेल.”

“जर तुम्ही विराटला एक क्रिकेटपटू म्हणून पहिले तर समजेल जो जसा खेळाडू आहे त्याचे कारण तो प्रत्येकवेळी शिकत असतो. मला याचे आश्चर्य वाटते कि जेव्हाही तो मैदानात जातो तेव्हा त्याची सगळी ऊर्जा घेऊन फलंदाजी करतो. त्यामुळे मला असे वाटते की स्मिथने केलेले स्टेटमेंट खूप लवकर केले. विराटला अजून भारताबाहेर नेतृत्व करण्यासाठी अनेक गोष्टी शिकायच्या आहेत आणि तो वेळेबरोबर त्या शिकेल.

याबरोबरच गांगुलीला जेव्हा विचारण्यात आले की विराटला आशिया बाहेर खेळण्यासाठी कर्णधार म्हणून तपासले जाते आहे का? यावर गांगुली म्हणाला, “मला आश्चर्य वाटले नाही कारण प्रत्येक आंतरराष्ट्रीय कर्णधाराला जेव्हा तो त्याच्या देशाबाहेर खेळायला जातो तेव्हा त्याला कर्णधार म्हणून तपासले जाते. पण मी काहीसा निराश आहे, ज्या प्रकारे गेली दोन तीन वर्ष क्रिकेट जसे खेळले गेले त्यासाठी. तुम्ही जेव्हा तुमच्या देशाबाहेर जात आणि एक वेगळाच संघ बनता”

ग्रामी स्मिथने विराटवर टीका करताना म्हटले होते की, “मला नक्की माहित नाही की भारतीय संघ विराटकडे एक दीर्घकाळ नेतृत्व करणारा कर्णधार म्हणून पाहत आहे की नाही? या संपूर्ण वर्षभरात तो भारताच्या बाहेर क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे त्याला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. अशा काळात त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तो किती काळ भारताचा कर्णधार राहील यात शंका आहे. ”

स्मिथच्या याच वक्त्यव्यावर गांगुलीने नाराजी व्यक्त केली आहे.