तिसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेची भारतावर ७ धावांची किरकोळ आघाडी

मेलबर्न । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डाव आज दुसऱ्या दिवशी १९४ धावांवर संपुष्ठात आला. ६५.५ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला.

दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात हाशिम अमलाने ६१ तर व्हर्नोन फिलँडरने ३५ धावा केल्या. याच आफ्रिकेच्या डावातील सर्वोच्च धावा ठरल्या.

भारताकडून जबरदस्त गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने १८.५ षटकांत ५४ धावा देत ५ तर भुवनेश्वर कुमारने १९ षटकांत ४४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दक्षिण आफ्रिकेत ५ विकेट्स घेणारा बुमराह केवळ चौथा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने प्रथमच कसोटीच्या डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.