काय सांगता! दक्षिण आफ्रिका ७३ धावांवर आॅल आऊट!

गाॅल | श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ चक्क ७३ धावांवर सर्वबाद झाला. दिलरुवान परेरा ६ तर रंगाना हेराथने ३ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला आॅल आऊट करण्यात मोठी भुमिका पार पाडली.

पहिल्या डावात श्रीलंका संघाने २८७ तर दुसऱ्या डावात १९० धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा काल पहिला डाव १२६ धावांत संपुष्टात आला तर आज दुसरा डाव केवळ ७३ धावांत संपुष्टात आला.

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून वर्नोन फिलेंडरने २२ तर एडन मार्क्रमने १९ धावा केल्या. यष्टीरक्षक डिकाॅक १० धावांवर बाद झाला. हे तीन खेळाडू सोडून कुणालाही दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही.

क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. यापुर्वी भारतीय संघाने त्यांना नागपुरला २०१५मध्ये ९५ धावांत सर्वबाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार

-भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी