दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयासह दक्षिण अफ्रिकेची मोठ्या क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी

दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण अफ्रिकेने झिम्बाब्वेवर 6 विकेटने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

दक्षिण अफ्रिकेचा संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर फलंदाजीत थोडासा संघर्ष करत आहे. दक्षिण अफ्रिकेचे गोलंदाज मात्र अप्रतिम कामगिरी करत आहेत.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर झिम्बाॅब्वेच्या कर्णधार हॅमील्टन मसकझाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा डाव 7 विकेटच्या मोबदल्यात 132 धावांवर  थाोपवण्यात दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले.

तबरेज शाम्सी हा दक्षिण अफ्रिकेकडून सर्वात महागडा गोलंदाज त्याने 4 षटकात 37 धावा दिल्या.

132 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकच्या फलंदाजांनी सावध खेळ करत 16 व्या षटकातच विजय मिळवला. जे पी ड्युमिनीने सर्वाधिक 33 धावा केल्या.

झिम्बाॅब्वेच्या महत्वाच्या दोन फलंदाजांना बाद करणाऱ्या डॅन पॅटरसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

“हा पुरस्कार सर्वच गोलंदाजांच्या  उत्कृष्ट कामगिरीला आहे.” असे पॅटरसनने सामना संपल्यानंतर सांगितले.

दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाॅब्वे यांच्यातला शेवटचा सामना 14 आॅक्टोबरला बेनोनी येथे होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-