असा आहे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मालिकेत १-० अशा आघाडीवर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात डेल स्टेनच्या जागी लुंगीसानी न्गिडीला संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघात ३ बदल करण्यात आले असून सलामीवीर शिखर धवनच्या जागी केएल राहुल, जखमी वृद्धिमान सहाच्या जागी पार्थिव पटेल आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी इशांत शर्माला संधी देण्यात आली आहे.

इशांतला संघात स्थान देताना तो बाउंस चेंडू जास्त टाकू शकतो हा विचार करण्यात आला आहे.

असा आहे भारतीय संघ: मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, पार्थिव पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह