दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमारने हाशिम अमलाला बाद करत दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला आहे.

भुवनेश्वरने सामन्याच्या चौथ्या षटकात ५ व्या चेंडूवर अमलाला रिद्धिमान सहाकडे झेल देण्यास भाग पाडले. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना भुवनेश्वरनेच लवकर बाद करून आफ्रिकेच्या फलंदाजीला चांगलाच धक्का दिला आहे.

दक्षिण आफ्रिका सध्या सामन्याच्या पहिल्या डावात ३ बाद १५ धावांवर खेळत आहे. फाफ डु प्लेसिस(१*) आणि ए बी डिव्हिलियर्स(१४*) नाबाद खेळत आहेत.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.