दक्षिण आफ्रिकेला पहिला मोठा धक्का, भुवनेश्वर कुमारला मिळाली विकेट

आजपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना केपटाऊन येथे सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गारला शून्यावरच बाद करत भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेला पहिलाच धक्का दिला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भुवनेश्वर कुमारने सामन्यातील पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर एल्गारला झेलबाद केले. यष्टीरक्षक रिद्धिमान सहाने त्याचा झेल घेतला.

त्यामुळे आता तिसऱ्या क्रमांकावर हाशिम अमला खेळायला आला आहे. त्याच्याबरोबर सलामीवीर एडन मारक्रम खेळत आहे.