दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज स्वस्तात तंबूत

सेन्चुरियन।भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला दोन मोठे धक्के बसले आहे. त्यांचे आघाडीचे फलंदाज ३ धावांत तंबूत परतले आहेत.

त्यांचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करमला आणि अनुभवी फलंदाज हाशिम अमलाला बाद करत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताला सुरवातीला यश मिळवून दिले.

बुमराहने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मार्करमला पायचीत बाद केले आहे. बुमराहाचे हे दुसऱ्या डावातील हे पहिलेच षटक होते. त्याच्या पाठोपाठ सामन्याच्या ५.३ षटकात हाशिम अमलालाही बुमराहने पायचीतच बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची २ बाद ३ धावा अशी अवस्था झाली.

भारताने या सामन्यात पहिल्या डावात सर्वबाद ३०७ धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २८ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने १५३ धावांची दीडशतकी खेळी केली.