दुसरी कसोटी: भारतीय गोलंदाज चमकले; हा मोठा खेळाडू झाला बाद

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सला इशांत शर्माने बाद केले आहे.

इशांतने डिव्हिलियर्सला पहिल्या डावाच्या ६४.४ षटकात २० धावांवर असताना त्रिफळाचित करून दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. डिव्हिलियर्सने हाशिम अमलाला चांगली साथ दिली होती. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली.

याआधी आर अश्विनने एडन मार्करम(९४) आणि डीन एल्गार(३१) या सलामीवीरांना बाद केले होते.

सध्या दक्षिण आफ्रिका ६६ षटकात ३ बाद २०८ धावांवर खेळत आहे. हाशिम अमलाने नाबाद अर्धशतक झळकावताना ५६ धावा केल्या आहेत. त्याच्या साथीला खेळण्यासाठी कर्णधार फाफ डु प्लेसिस आला आहे.