भारताविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा

आज क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने भारताविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ घोषित केला आहे. ही ३ सामन्यांची टी २० मालिका होणार असून १८ फेब्रुवारी पासून या मालिकेला सुरुवात होईल.

वनडे मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडलेला नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि क्विंटॉन डिकॉकला या टी २० मालिकेलाही मुकावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या टी २० संघाचे प्रभारी कर्णधारपद जेपी ड्युमिनीकडे देण्यात आलेले आहे.

तसेच वनडे मालिकेसाठी संघात असलेल्या १५ खेळाडूंपैकी ८ खेळाडू या टी २० संघात कायम आहेत. भारतीय संघाची या टी २० मालिकेसाठीची घोषणा २ आठवड्यांपूर्वीच झाली आहे.

असा आहे दक्षिण आफ्रिकेचा टी २० मालिकेसाठीचा संघ: जेपी ड्युमिनी(कर्णधार), फरहान बेहार्डीन, एबी डिव्हिलियर्स, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरीस,अँडिल फेहलूकवयो, ताब्राईझ शम्सी, जुनिअर डाला,रिझा हेन्ड्रिक्स,ख्रिस्तियन जोंकर,डेन पीटरसन,एरॉन फँगिसो,जे जे स्मटस.